आयुषमान बनला 'ड्रीमगर्ल'
महा एमटीबी   04-Dec-2018

 


 
  
मुंबई : अभिनेता आयुषमान खुराना याचा आगामी सिनेमा ‘ड्रीमगर्ल’ लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ड्रीम गर्लचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये आयुषमान खुराना चक्क स्त्रीवेशात दिसत आहे. आयुषमानने यात पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. हातात मॅचिंग पिवळ्या बांगड्यादेखील भरल्या आहेत.
 
 
 
 

स्कूटरवर बसलेल्या आयुषमानच्या मागे एक मंदिर दिसत असून रामलीला सेवा समितीचा बोर्ड लागला आहे. त्याशेजारीच जीवन मरण नावाचे एक दुकानही दिसत आहे. या रंजक पोस्टरमुळे प्रेक्षकांची या सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली आहे. ट्विटरवर आयुषमानने ड्रीम गर्ल या सिनेमाची स्क्रीप्ट कशी मिळाली. याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. एकता कपूरने या सिनेमाची निर्मिती केली असून राज शांडिल्य यांचे दिग्दर्शन आहे. अभिनेत्री नुसरत भरुचा या सिनेमात आयुषमान सोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/