नाशिक विभागात लाचखोरीत जळगाव जिल्हा अव्वल
महा एमटीबी   31-Dec-2018
जळगाव, 31 डिसेंबर
अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडून वर्ष 2018 मध्ये केलेल्या कारवाई अग्रस्थानी जळगाव जिल्हा असून सर्वात शेवटी नंदूरबार जिल्हा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 5 ने लाचखोरांची संख्या घटली आहे.
 
 
नाशिक परिक्षेत्रात नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. 2017 मध्ये सर्वाधिक कारवाई नाशिक जिल्ह्यात 36 झाल्या होत्या त्या खालोखाल अहमदनगर 28, धुळे 22, जळगाव 25 व नंदूरबार 9 अशा 120 कारवाई झाल्या होत्या.
 
 
2018 मध्ये सर्वाधिक कारवाई जळगाव 30, अमदनगर 27, नाशिक 26, धुळे 21 आणि नंदूरबार 11 अशा 115 कारवाई झाल्या. 2017 च्या कारवाईंच्या तुलनेत 2018 मध्ये 5 ने घट झाली.2018 मध्ये झालेल्या कारवाईत जळगाव मध्ये 5 व नंदूरबारमध्ये 2 कारवाईची वाढ झाली आहे