उल्लास नारायणची ऐतिहासिक कामगिरी
महा एमटीबी   03-Dec-2018अल्ट्रा रनिंग स्पर्धेत पटकावले कांस्यपदक


नवी दिल्ली : तैवानची राजधानी तैपेई येथे सुरु असलेल्या इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ अल्ट्रा रनिंग स्पर्धेत भारताच्या उल्लास नारायण याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. २०१८ सालच्या या स्पर्धेत नारायण याने कांस्यपदक पटकावले. अल्ट्रा रनिंग स्पर्धेत वैयक्तिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या स्पर्धेत नारायणने २४ तासामध्ये २५० किमीचे अंतर पार करत तिसरे स्थान पटकावले. जापानच्या योशिहिको इशिकावाने २५३ किमी अंतर पार करत पहिले तर जापानच्याच हमवतन नोबुयुकी ताकाहाशीने २५२ किमी अंतर पार करत दुसरे स्थान पटकावले.

 

भारतीय संघाला पदक

 

इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ अल्ट्रा रनिंग स्पर्धेच्या सांघिक प्रकारात भारतीय संघाने कांस्यपदक पटकावले. उल्लास नारायण, सुनील शर्मा (२०२ किमी) आणि एलएल मीना (१९२ किमी) या भारतीय संघाने ६४४ किमी पार करत कांस्यपदक पटकावले. जापानने ७५६ किमी अंतर पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले तर, ऑस्ट्रेलियाने ६८४ किमी अंतर पार करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/