‘सिंघम’ची आठवण करून देणारा ‘सिंबा’
महा एमटीबी   03-Dec-2018

 


 
 
मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित अभिनेता रणवीर सिंहचा बहुचर्चित ‘सिंबा’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘टेंपर’ या तामिळ सिनेमाचा ‘सिंबा’ हा अधिकृत रिमेक आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अॅक्शनपॅड सिनेमा या समीकरणाची पर्वणी पुन्हा एकदा प्रेक्षकांना लाभणार आहे.
 
 
 
 

 

‘सिंबा’मध्ये अभिनेता रणवीर सिंह याने संग्राम भालेराव नावाच्या मराठमोळ्या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची सुपुत्री सारा अली खान ‘सिंबा’ मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘सिंबा’चा ट्रेलर पाहताना प्रेक्षकांना ‘सिंघम’ची आठवण होणे स्वाभाविक आहे. बाजीराव सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणची ‘सिंबा’ या सिनेमामध्ये झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/