२.०ने केली ४ दिवसात ४०० कोटींची कमाई
महा एमटीबी   03-Dec-2018


 


मुंबई : 'थलैवा दी बॉस' रजनीकांत आणि अक्षयकुमार यांची प्रमुख भूमिका असलेल्या २.० चित्रपटाने जगभरात ४ दिवसांमध्ये ४०० कोटी कमावले. उत्तर भारत आणि इतर हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. मागील आठवड्यात गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतामध्ये तब्बल ६४ कोटींची कमाई केली होती.

 

बहुचर्चित २.० चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ४५ कोटी रुपये कमवले तर, तिसऱ्या दिवशी ५६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर फक्त रविवारचा आकडा हा ८० ते ९० कोटींच्या घरात आहे. आतापर्यंतचा आकडा ४०० कोटींवर पोहोचला आहे. रविवारची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही तरी हा सिनेमा पहिल्या आठवड्यात ५०० कोटींचा आकडा आोलांडेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तब्बल ५५० कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेला हा बॉलिवूडचा सगळ्यात महागडा सिनेमा आहे. भारतासह जगभरात हा चित्रपट चांगली कमाई करत आहे.

 

संबंधित बातमीसाठी या लिंक वर क्लिक करा ...

 २.०ची ‘रेकॉर्ड ब्रेक’ कमाई
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/