भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ; भारताची प्रतिष्ठा पणाला
महा एमटीबी   03-Dec-2018


 


अॅडलेड : ६ डिसेंबरपासून अॅडलेडमध्ये भारत आणि आस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारत आणि आस्ट्रेलियाचे सामने हे संघर्षमय आणि नाट्यमय असतात. तसेच त्यांच्यातील सामना हा प्रतिष्टेची लढाई मनाली जाते. टी-२० मालिकेतील अपयश पाहता कसोटी मालिका जिंकण्याचे तगडे आव्हान भारतासमोर आहे. त्यातच भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत एकदाही कांगारूंना त्यांच्या मायदेशी कसोटी मालिकेत भारताने हरवलेले नाही. त्यामुळे ही ७० वर्षाची प्रतीक्षा 'विराटसेना' संपवते का? हे पाहणे औस्त्युक्याचे ठरणार आहे.

 

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा खेळ बराच सुधारला आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या ४६ पैकी २६ कसोटी सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिज, साऊथ आफ्रिकासारख्या संघांना धूळ चारली आहे. तेव्हा ऑस्ट्रेलिया त्यांच्याच धरतीवर मात देण्याची किमया विराट कोहली साधू शकतो. २००३-०४ मध्ये थोडक्यात ही संधी हुकली होती. तेव्हा हे भारताचे ७० वर्षं स्वप्न विराट सेना पूर्णकरते का याची क्रिकेटविश्वात चर्चा सुरू आहे. या कसोटी मालिकेनंतर काही महिन्यांतच वर्ल्ड कपही खेळला जाणार आहे. त्यामुळे ही मालिका जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताचे फलंदाज आणि गोलंदाजही सध्या फॉर्मात असून ही कसोटी मालिका जिंकणे भारताला शक्य आहे.

 

सराव सामना अनिर्णित

 

भारतीय संघ कसोटी मालिका सुरु होण्याआधी चार दिवसीय सराव सामन्यात संघाची कामगिरी आजमावली. पण हवी तशी कामगिरी संघाला करता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्ध खेळताना पहिला डाव ३५८वर आटोपला. यामध्ये पृथ्वी शॉने सर्वाधिक ६६ धावा केल्या तर त्यानंतर कर्णधार कोहलीने ६४ धावा केल्या. यांच्या सोबतच पुजारा, राहणे आणि हंगाम विहिरीने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीमध्ये भारताकडून शमीने ३ तर अश्विनने २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर उमेश यादव, इशांत शर्मा, विराट कोहली आणि जस्मित बुमराह यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलिया एलेव्हनला ५४४ वर सर्व बाद केल्यानंतर के.एल. राहुल आणि मुरली विजय यांनी शतकी भागीदारी करत भारताला भक्कम स्थितीमध्ये आणले. अखेरच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने २११ वर २ विकेट असा आलेख रचला होता. त्यामध्ये राहुलच्या ६९ धावा तर मुरली विजयच्या १२९ धावांचा समावेश होता.

 

धडाकेबाज पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीला मुकणार

 

फॉर्मात असलेला पृथ्वी शॉ मात्र पहिल्या कसोटीला मुकणार आहे. सराव सामन्यात त्याला क्षेत्ररक्षण करताना पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला काही काळ मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. त्याच्या अनुपस्तिथीत सलामीला कोण असेल? हा प्रश्न कर्णधार विराट कोहली समोर नक्कीच असेल. पृथ्वी शॉने पदार्पणातच आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्याची जागा आता कोण घेणार हे पाहणे एक उत्सुकतेचा विषय आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/