कॉंग्रेसने इथेही केले घोटाळे !
महा एमटीबी   03-Dec-2018
 

राजस्थान : प्रतापगढमध्ये राजस्थान निवडणूकांचा प्रचार जोरदार रंगला आहे. यावेळी प्रचारसभेदरम्यान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. कॉंग्रेसने निवडणूक तर लढवली आहे मात्र, त्यांचा सेनापतीच अद्याप ठरलेला नाही. विधानसभा निवडणूकीत अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच लोकांना माहित नसल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच कॉंग्रेसच्या राजवटीतील घोटाळ्यांवरूनही त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

 

प्रतापगडमध्ये एका सभेदरम्यान ते बोलत होते. कॉंग्रेसने आकाश-पाताळ, जमिन-समुद्र, अवकाश या साऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार केला आहे. कॉंग्रेसने इस्त्रो, टू-जी घोटाळे केले. आकाशात ऑगस्टा वेस्ट लॅण्ड घोटाळा केला. आदर्श घोटाळा जमिनीवर, समुद्रात पाणबुड्यांचा घोटाळा आणि पाताळात कोळसा घोटाळा केला.”, अशी टीका त्यांनी कॉंग्रेसवर केली.

 
 
 

यावेळी मतदारांना संबोधित करताना ते म्हणाले, कॉंग्रेस हे घुसखोरांच्या मागे उभी आहे. आम्ही इथल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी विचार करत आहोत. एकीकडे भाजप देशभक्तांचा पक्ष आहे तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्ष ज्या पक्षाचा कोणताही सिद्धांत नाही. त्यामुळे तुम्हाला आता जनेतेने यातून पर्याय निवडावा, असे आवाहन केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/