रणवीरच्या सिम्बाची पाहिल्यादिवशी २० कोटींची कमाई
महा एमटीबी   29-Dec-2018
मुंबई : रणवीर सिंगच्या बहुचर्चित 'सिम्बा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०.७२ कोटींचा गल्ला जमवत रणवीरच्या इतर चित्रपटांनाही मागे टाकले आहे. त्यामुळे 'सिम्बा' हा रणवीरची भूमिका असलेला सर्वाधिक ओपनिंग मिळविणारा चित्रपट ठरला आहे. 'सिम्बा'ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील सारा अली खान सोबत रणवीरच्या जोडीलाही पसंती मिळत आहे.

 

त्याआधी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या 'झिरो' चित्रपटालाही मागे टाकले आहे. 'झिरो'ची पहिल्या दिवशीची कमाई २०.५ कोटी इतकी होती. 'सिम्बा'चे एकूण बजेट ८० कोटींच्या घरात आहे. जगभरात ४ हजार स्क्रिन्सवर प्रदर्शित झालेल्या हा सिनेमा आठवड्याच्या शेवटी किती कमाई करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याचसोबत सिम्बाने रणवीरच्या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/