पुन्हा दुमदुमणार ‘कानडा राजा पंढरीचा’
महा एमटीबी   29-Dec-2018


 
 
 
 
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. ‘कानडा राजा पंढरीचा’ हे गाणे या सिनेमात नव्याने रसिकांना पाहायला मिळणार आहे. पु.ल देशपांडे यांच्यासोबत कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे यांची रंगलेली मैफल या सिनेमात दाखविण्यात येणार आहे.
 
 
 
 

या मैफलीत ‘कानडा राजा पंढरीचा’ हे गाणे म्हणत विठुरायाचा गजर होताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राहुल देशपांडे, जयतीर्थ मेवुंडी आणि भुवनेश कोमकली यांनी हे गाणे स्वरबद्ध केले आहे. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून अभिनेता सागर देशमुख याने या सिनेमात पु.ल देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा पूर्वाध ४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून सिनेमाचा उत्तरार्ध ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/