‘अशी ही आशिकी’मध्ये ‘ही’ अभिनेत्री
महा एमटीबी   27-Dec-2018


 
 
 
 
मुंबई : काही दिवसांपूर्वी ‘अशी ही आशिकी’ या मराठी सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शत करण्यात आले होते. अभिनय बेर्डे याची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. परंतु या सिनेमाची नायिका कोण आहे? हे गुलस्त्यात ठेवण्यात आले होते. सिनेमाच्या पोस्टरमध्ये अभिनय बेर्डेचा हात धरून पाठमोरी उभी असलेली लाल ड्रेसमधील अभिनेत्री कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. परंतु हे गुपित आता उघड झाले आहे. हेमल इंगळे असे या अभिनेत्रीचे नाव आहे.
 
 
 

 
 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या नवीन पोस्टरमधून हा उलगडा करण्यात आला आहे. अभिनेते सचिन पिळगावकर या सिनेमाची निर्मिती करत आहेत. नव्या काळातील जोडपे आणि त्यांच्यात फुलणारी प्रेमकथा या सिनेमात दाखविण्यात येणार आहे. आजची तरुण पिढी या सिनेमाशी चटकन जोडली जाईल, अशा आशयाचा हा सिनेमा आहे. पुढील वर्षी १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 
 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/