‘ठाकरे’ सिनेमातील संवादावर सिद्धार्थ नाराज
महा एमटीबी   27-Dec-2018 
 
 
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने या सिनेमातील एका संवादावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘उठाओ लुंगी, बजाओ पुंगी’ असा एक संवाद या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आला आहे. शिवसेना पक्षाच्या स्थापनेनंतर दाक्षिणात्य आंदोलनाची झलक या ट्रेलरमधून दिसून येते. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारा नवाजुद्दीन सिद्दीकी हा संवाद सिनेमातील एक भाषणादरम्यान बोलताना दाखवला आहे. परंतु या संवादाबाबत अभिनेता सिद्धार्थ आपली नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे.
 
 
 
 
 
 
 
 

हा संवाद दक्षिण भारतीयांविरोधात द्वेष पसरवणारा आहे. अशाप्रकारे द्वेष पसरवणाऱ्या सिनेमाला तुम्ही प्रतिसाद देणार का?” असा प्रश्न सिद्धार्थने उपस्थित केला आहे. तसेच त्याने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीबाबतही त्याने टीका केली आहे. येत्या २५ जानेवारी रोजी ‘ठाकरे’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या दिवशी इतर कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही. असा इशारा शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला आहे. तसेच सिनेमात दाखविण्यात आलेल्या राम मंदिराबाबतच्या काही संवादांवर आणि दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाबाबतीत वाद निर्माण होण्याची चिन्हे आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/