'ठाकरे' चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
महा एमटीबी   26-Dec-2018


 


मुंबई : बहुचर्चित 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शन सोहळा बुधवारी दिमाखात पार पडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. शिवसैनिकांसह देशभरातील बाळासाहेबांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने या चित्रपटामध्ये बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे. या ट्रेलरमुळे बाळासाहेबांची कारकीर्द पुन्हा एकदा अनुभवता येईल असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'ठाकरे' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे निर्मितीसोबतच त्यांनी या चित्रपटाची पटकथादेखील लिहिली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अभिजित पानसे यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २३ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हिंदी तसेच मराठी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

 
 
 

ट्रेलर प्रदर्शनासाठी शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, निर्माता संजय राऊत, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव, दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यासह चित्रपटातील इतर कलाकारही उपस्थित होते. वडाळ्यातील आयमॅक्स थिएटरमध्ये हा ट्रेलर प्रदर्शन सोहळा पार पडला.

 

संबंधित बातमी वाचा :

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/