ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची खंबीर सुरुवात
महा एमटीबी   26-Dec-2018मेलबर्न : बुधवारी मेलबर्नवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या निर्णायक कसोटी सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या दिवसाअखेर भारताने २ विकेट गमावत २१५ धावांची मजल मारली. मयांक अग्रवाल आणि पुजारा यांच्या अर्धशतकांचा यामध्ये समावेश आहे. पाहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार विराट कोहली ४७ तर पुजारा ६८ धावांवर खेळत होते.

 

तिसऱ्या कसोटीमध्ये भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची नवी सलामी जोडी म्हणून हनुमा विहारी आणि मयांक अग्रवाल यांनी खेळाची सुरुवात केली. पण अवघ्या ८ धावांवर असताना ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सने विहिरीला बाद केले. त्यानंतर पुजारा आणि अग्रवाल यांच्या भागीदारीच्या जोरावर भारताला १००चा पल्ला गाठता आला. ७६ धावांवर मयांक अग्रवाल बाद झाला. त्यानंतर संघाची धुरा ही कर्णधार कोहली आणि पुजारा यांनी सांभाळली. पहिल्या दिवसाअखेर कोहली नाबाद ४७ आणि पुजारा नाबाद ६८ धावांवर खेळत आहेत.

 

भारतीय संघात केले ३ बदल

 

भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीसाठी संघात ३ बदल केलेत. मयांक अग्रवालने भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण केले. तंदुरुस्त झाल्यानंतर रोहित शर्माही संघात परतला आहे. खराब फॉर्मात असणाऱ्या मुरली विजय आणि लोकेश राहुल यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. तर, वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागी रविंद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाने संघात एकमेव बदल करताना मिचेल मार्शला संघात घेतले आहे. दोन्ही संघ मालिकेत १-१ ने बरोबरीत आहेत. तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून आघाडी घेण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/