सलमान खान लाँच करणार मांजरेकरांच्या कन्येला
महा एमटीबी   25-Dec-2018

 

 
 
 
 
मुंबई : आजवर अनेक नवोदित अभिनेत्रींना सलमान खानने बॉलिवुडमध्ये लाँच केले आहे. लवकरच सलमान खान हा दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांच्या मुलीला बॉलिवुडमध्ये लाँच करणार आहे. यापूर्वी महेश यांच्या मुलाला सत्या मांजरेकरला बॉलिवुडमध्ये लाँच करण्याची जबाबदारी सलमानने घेतली होती. आता महेश यांची मुलगी अश्वामी हिला तो लाँच करणार आहे.
 

खुद्द महेश मांजरेकर यांनी हे वृत्त खरे असल्याची माहिती दिली आहे. चांगली संधी मिळाली तर लगेच चित्रिकरणाला सुरुवात होईल.” असे महेश मांजरेकर म्हणाले. तसेच सलमान खान याच्याविषयी बोलताना ते म्हणाले की “सलमान खान ही बॉलिवुडमधील सर्वात दयाळू व्यक्ती आहे. त्याची मानसिकता ही मध्यमवर्गीयांसारखी आहे. मी त्याची स्तुती करणार नाही. हे त्याला ठाऊक आहे. त्यामुळेच आमची मैत्री आणखी घट्ट झाली आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/