‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत दिसणार ‘ही’ रिअल बापलेकीची जोडी
महा एमटीबी   25-Dec-2018

 

 
 
 
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत लवकरच बापलेकीची एक जोडी दिसणार आहे. ही जोडी दुसरी तिसरी कोणी नसून डॉ. अमोल कोल्हे आणि त्यांची मुलगी आद्या कोल्हे आहे.
 
 
 
 

डॉ. अमोल कोल्हे या मालिकेत संभाजी राजे यांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. तर त्यांची मुलगी आद्या ही स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुलगी तारा हिची भूमिका साकारत आहे. आद्याची ही पहिलीच मालिका आहे. परंतु तिच्यापेक्षा जास्त उत्साही तिचे बाबा अर्थात डॉ. अमोल कोल्हे आहेत. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/