धोनीचे भारतीय टी-२० संघात पुनरागमन
महा एमटीबी   24-Dec-2018मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली. टी-२०मधून बराच वेळ बाहेर असलेल्या धोनीला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात धोनीसह गोलंदाज हार्दिक पंड्या आणि मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवला संधी दिली आहे. मात्र, रिषभ पंतला स्थान देण्यात आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात पंतची निवड केली आहे. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रत्येकी तीन टी-२० सामन्यांत संघाबाहेर बसावे लागलेल्या धोनीवर निवड समितीने विश्वास दाखवत त्याची संघात निवड केली आहे. अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्यालाही संघात स्थान देण्यात आले आहे.

 

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, शिखर धवन, रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एम. एस. धोनी (विकेट कीपर) हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शामी

 

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ

 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एम. एस. धोनी (विकेट कीपर), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/