‘झिरो’ नावाप्रमाणेच झिरो; मराठीची चांदी
महा एमटीबी   22-Dec-2018मुंबई : सुपरस्टार शाहरुख खान, कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा अशी सुपरहिट स्टारकास्ट असूनसुद्धा झिरोचित्रपटाने प्रेक्षकांची घोर निराशा केली आहे. समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनीही या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. मात्र के.जी.एफया चित्रपटाला भारतभर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेले माउलीआणि मुंबई पुणे मुंबई ३या चित्रपटांना मराठी सोबतच अमराठी प्रेक्षकसुद्धा पसंती देत आहेत.

 

झिरोचित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. ख्रिसमसच्या सलग येणाऱ्या सुट्ट्या आणि बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्याचे चित्रपट (खासकरून खान मंडळी) हे समीकरण काही नवीन नाही. यावेळी ख्रिसमसचे अवचित्य साधून आनंद एल रे दिग्दर्शित झिरोचे पोस्टर वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांसमोर आणले होते. शाहरुख खानच्या त्या वेगळ्या लूकमधल्या पोस्टरची सगळीकडे चर्चा झाली. पहिल्यांदा शाहरुख खान एका ठेंगण्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार होता. त्यामुळे काहीतरी वेगळं पाहायला मिळणार अशी इच्छा सर्व शारुख खानच्या चाहत्यांची होती. पण झिरोत्यावर फोल ठरला. त्याउलट के.जी.एफ.या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

 

माउलीने कमावला २० कोटींचा गल्ला

 

रितेश देशमुख, सयामी खेर, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी यांचा ‘माउली’ हा मराठी चित्रपट समीक्षांसोबतच प्रेक्षकांचीही वाहवाही मिळवली. हिंदी आणि इंग्लिश चित्रपटांचा एवढा मोठा गोतावळा असतानादेखील माउलीचित्रपटाने आठवड्यामध्ये २० कोटींचा आकडा पार केला. तसेच ‘मुंबई पुणे मुंबई ३’ ही चांगली कमाई करत आहे. त्यामुळे येणार आठवडा आणि ख्रिसमसची सुट्टी यामध्ये मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांचा ओघ असेल हे निश्चित.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/