निवेदिता सराफ यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन
महा एमटीबी   22-Dec-2018

 


 
 
मुंबई : अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व! आजवर निवेदिता सराफ यांनी आजवर अनेक सिनेमा, मालिका आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाने मराठी रसिक प्रेक्षकांवर भुरळ पाडली. आता निवेदिता सराफ या पुन्हा छोट्या पडद्यावर आपले पुनरागमन करत आहेत.
 

कलर्स वाहिनीवरील केसरी नंदन या हिंदी मालिकेतून त्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेत निवेदिता या ‘रानी देवी’ ची भूमिका साकारत आहेत. एका पैलवानाच्या मुलीची ही कथा आहे. या मुलीला जीवनात कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो. हे या मालिकेतून दाखविले जाणार आहे. राजस्थानमध्ये घडणारी ही कथा आहे.

 

राजस्थानची संस्कृती तेथील बोलीभाषा, तेथील परंपरा हे सगळे या मालिकेद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या कुटुंबासाठी आपले सर्वस्व अर्पण करू पाहणाऱ्या एका सोशिक स्त्रीची भूमिका निवेदिता साकारत आहेत. निवेदिता सराफ ‘रानी देवी’च्या या व्यक्तिरेखेला परिपूर्ण न्याय देतील, यात शंकाच नाही! परंतु प्रेक्षक त्यांच्या या भूमिकेला आणि या मालिकेला कसा प्रतिसाद देतात. हे पाहण्याजोगे असेल.

 
 
     माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/