मितालीकडे एकदिवसीय सामन्यांची धुरा
महा एमटीबी   22-Dec-2018मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. २४ जानेवारीपासुन या दौऱ्याची सुरूवात होत आहे. मिताली राजला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनविण्यात आले आहे, तर हरमनप्रीत कौरला टी-२० संघाचा कर्णधारपद देण्यात आले आहे. कृष्णमूर्तिच्या जागी प्रिया पुणियाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

 

संघाचे नवे प्रशिक्षक डब्लू. व्ही. रमन यांनी टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. प्रशिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतीय महिलांचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर ३ एकदिवसीय तर ३ टी-२० सामने खेळणार आहे.

 

एकदिवसीय संघ

 

मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, स्मृति मंधाना, पुणम राउत, दीप्ती शर्मा, तान्या भाटिया, डी हेमलता, मोना महेशराम, एकता बिष्ट, पुणम यादव, राजेश्वरी गायकवाड़, झुलन गोस्वामी, मानसी जोशी आणि शिखा पांडे

 

टी-२० संघ

 

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, मिताली राज, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, अनुजा पाटिल, डी हेमलता, मानसी जोशी, शिखा पांडे, तान्या भाटिया, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि प्रिया पुणिया

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/