युट्युबर दानिश झेहेनचा अपघाती मृत्यू
महा एमटीबी   20-Dec-2018


 


मुंबई - युट्युब, टिकटॉक तसेच सर्वच लोकप्रिय समाजमाध्यमांवर आणि इंटरनेटवर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असणारा दानिश झेहेनचा गुरुवारी एका गंभीर अपघातात मृत्यू झाला आहे. २१ वर्षीय दानिश हा वाशी येथे लग्नाला गेला होता. मुंबईला परतत असताना महामार्गावरील त्याच्या गाडीला अपघात झाला. यात त्याचा मृत्यू झाला. कमी वयात दानिश हा सोशल मीडियावर स्टार झाला. देशात त्याचे लाखो-करोडोंमध्ये चाहते आहेत. दानिश टिकटोक, इन्स्टग्राम, फेसबुक यावर प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व स्टायलिस्ट, ब्लॉगर, मॉडेल होता. दानिशच्या अनेक चाहत्यांनी समाजमाध्यमांवर शोक व्यक्त केला आहे. 'स्पेस'चे विकास गुप्ता, दिव्य अग्रवाल आणि चेतना पांडे यांनीही ट्विटरवर दुःख व्यक्त केले.

 

कोण होता दानिश झेहेन?

 

दानिश झेन हे नाव युट्युबच्या चाहत्यांना काही नवीन नाही. त्याचे बरेच व्हिडियो बरेच वायरल झाले. सध्याच्या तरुण-तरुणींमध्ये त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळत होती. सध्या त्याच्या पेजला ३ लाख ५० हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत, तर त्याच्या प्रत्येक व्हिडियोला १० हजारपेक्षा जास्त लोक पाहतात. दानिश झेहेन एक युट्युबर होता आणि मुंबईचे जीवनशैली ब्लॉगर होता. तो जिलेटचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. त्याने जस्टिन बीबरच्या केस स्टाईलने आपला करिअर सुरू केले होते. एमटीव्हीच्या 'एस् ऑफ स्पेस'मध्ये दानिशने सहभाग घेतला होता. तेव्हापासून त्यांची लोकप्रियता समाजमाध्यमांवर वाढली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/