‘जी-सेक’मध्ये गुंतवणूक करावी का?
महा एमटीबी   20-Dec-2018गव्हर्नमेंट सिक्युरिटीज’चे ‘जी-सेक’ हे लघुरूप असून आर्थिक व्यवहारात मॠ -डशलीफ हा शब्दच वापरला जातो. गेल्या महिन्यात ‘झेरोधा’ या ब्रोकिंग कंपनीने ‘जी-सेक’ मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १० हजार रुपये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करता येणारी सोय सुरू करून दिली. राष्ट्रीय शेअर बाजारच्या मॠेइळवफ या अॅपने ‘जी-सेक’ ची किरकोळ गुंतवणूकदारांना खरेदी व विक्री करता येते.


‘जी-सेक’ हा एक गुंतवणुकीचा सुरक्षित व खात्रीचा पर्याय आहे. भारत सरकार यांची विक्री बॉण्ड्स स्वरूपात करते. हे बॉण्ड्स अल्प तसेच दीर्घ मुदतीचे विक्रीस काढले जातात. यातून जमा होणारा निधी भारत सरकार खर्चासाठी वापरते. भारत सरकारतर्फे या बॉण्ड्सवर व्याज दर जाहीर केला जातो व किरकोळ व अन्य गुंतवणूकदारांना हे व्याज सहामाही किंवा वार्षिक स्वरुपात दिले जाते. ज्यांची मुदत एक वर्षाहून कमी असते, त्यांना ‘ट्रेझरी बिल्स’ म्हटले जाते व ज्यांची मुदत एक वर्षाहून जास्त असते, त्यांना ‘बॉण्ड्स’ म्हटले जाते. या बॉण्ड्सच्या मुदतपूर्तीनंतर गुंतवणूकदाराला गुंतवलेली रक्कम राहिलेल्या व्याजासह परत मिळतेसध्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा ‘जी-सेक’ वर व्याज जास्त मिळते हे दर्शवणारा तक्ता

 

 
 

‘जी-सेक’चा पर्याय का निवडावा?

 

बॉण्ड्स सरकार विक्रीस काढत असल्यामुळे सुरक्षित आहेत. अल्प व दीर्घ मुदतीची गुंतवणूक संधी आहे. मुदत ठेवींपेक्षा जास्त दराने व्याज ‘जी-सेक’वर मिळते.

 

‘जी-सेक’मधील गुंतवणुकीतील अडचणी

 

गुंतवणुकीच्या कालावधीत पैशाची गरज पडल्यास पैसे मिळणे अडचणीचे होते. कारण, हे बॉण्ड्स शेअर बाजारात विकावे लागतात व शेअर बाजारात यांना मागणी नसते. म्हणून हे विकण्यात अडचणी येतात. कर्ज घेण्यासाठी ‘जी-सेक’ बॉण्ड्स तारण म्हणून स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे कर्ज घेण्यासाठी त्यांचा उपयोग होत नाही. कर्ज घेताना मुख्य सिक्युरिटी तसेच कोलेटरल सिक्युरिटी म्हणून ‘जी-सेक’ बॉण्ड्स स्वीकारले जात नाहीत. मुदत ठेवींत पाच वर्षांपर्यंत कमाल गुंतवणूक करता येते. यात मात्र ४० वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. परिणामी, दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी हा चांगला पर्याय आहे. सध्या सहकारी क्षेत्रातील सारस्वत बँक, टीजेएसबी बँक वगैरेंचा अपवाद सोडता बऱ्याच सहकारी बँका अडचणीत आहेत. पुण्याची रूपी बँक, मुंबईची सिटी सहकारी बँक आज प्रचंड अडचणीत असून या बँकांचे ग्राहक पूर्णतः भरडले गेलेले असून त्यांचे पैसे अडकून पडले आहेत. सरकारी बँकाही तोट्यात आहेत. खाजगी क्षेत्रात गुंतवणूक केलेलेही काही अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘जी-सेक’ मध्ये गुंतवणूक योग्य ठरू शकते. तुम्ही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एन.एस.सी) व सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या अल्प सुरक्षित गुंतवणूक पर्यायांत गुंतवणूक करत असाल तर त्याबरोबर ‘जी-सेक’ मध्ये गुंतवणुकीचा विचार करू शकता.

 

व्याज किती मिळते? हा विचार करण्यापेक्षा मूळ रक्कम परत निश्चित मिळेल व ठरविलेल्या दराने व्याज मिळेल, असे पर्याय निवडावे व हे पर्याय म्हणजे ‘जी-सेक’ तसेच अल्पबचत संचालनालयाच्या गुंतवणूक योजना. राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्य व्यवसाय अधिकारी के. हरी ‘जी-सेक’ मध्ये गुंतवणूक बाबत बोलताना म्हणाले की, “२०१७ मध्ये रिझर्व्ह बँकेने ‘जी-सेक’ गुंतवणूक योजना लोकाभिमुख व्हाव्यात म्हणून काही नियम केले पण, अजूनही किरकोळ गुंतवणूकदार ‘जी-सेक’ मध्ये गुंतवणुकीस हवे तितक्या संख्येने पुढे येत नाहीत, ही वस्तुस्थिती असून, अजून कित्येकांना हा गुंतवणूक पर्यायच माहीत नाही. त्यामुळे आम्ही ब्रोकिंग कंपन्यांना या योजनेचे फार मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करा, असे आवाहन केले आहे व यात जर फार मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवला गेला तर केंद्र सरकारकडे खर्चासाठी निधी उपलब्ध होईल व त्यांना खर्चासाठी निधी उभा करण्यासाठी जास्त दराने करआकारणी करावी लागणार नाही. १० ते ३० वर्षांसाठी या योजनांत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. यातील १० हजार रुपयांच्या व्यवहारांवर ‘झेरोधा’ ६ रुपये शुल्क आकारते तर, राष्ट्रीय शेअर बाजार काहीही शुल्क आकारत नाही. डिमॅट शुल्क मात्र भरावे लागते. ‘झेरोधा’ व राष्ट्रीय शेअर यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया एकदम सोपी असून, जर गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते असेल तर ‘ऑनलाईन’ रजिस्ट्रेशन करता येते. तुम्ही गुंतवणूक केलेले बॉण्डस् राष्ट्रीय शेअर बाजारच्या ॠेइळव प्लॅटफॉर्मवर डिमॅट खात्यात ‘स्टोअर’ केले जातात. व्यवहार करण्यासाठी गुंतवणूकदाराला ब्रोकर निवडावा लागतो. गुंतवणूकदाराला वैयक्तिक तपशील व पॅन (परमनंट अकाऊंट नंबर) द्यावा लागतो.

 

‘जी-सेक’मध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणूकही करता येते. ‘जी-सेक’ म्युच्युअल फंड कार्यरत असून त्याना ‘गिल्ट फंड्स’ म्हणतात. ‘गिल्ट फंड्स’ अल्प व दीर्घ मुदतीचे आहेत. यात जमा होणारा निधी १० वर्षांच्या कालावधीच्या ‘जी-सेक’ मध्ये गुंतवतात. म्युच्युअल फंडातून ‘जी-सेक’ मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला गरज पडल्यास तुमचा पैसा कधीही अधेमध्ये मिळू शकतो. यात तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीच्या मुदतपूर्तीच्या योजनांत गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या म्युच्युअल फंड योजना रोज एनएव्ही (नेट अॅसेट व्हॅल्यू) जाहीर करतात. त्यामुळे फंडाच्या दरात रोज बदल होतात. ‘जी-सेक’मधील पाच ते आठ वर्षांच्या कालावधीची गुंतवणूक अन्य लघु बचत योजनांपेक्षा जास्त परतावा देते. १० हून अधिक वर्षांची गुंतवणूक फार चांगला पर्याय आहे. त्यामुळे ‘जी सेक’ किंवा ‘गिल्ट फंड’ यात गुंतवणुकीचा पर्याय दुर्लक्षू नये!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/