'या' दोघींमुळे पुष्करचा उडाला आहे गोंधळ
महा एमटीबी   19-Dec-2018


 
 
 
मुंबई : अभिनेता पुष्कर जोग याचा आगामी 'ती & ती' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता पुष्कर जोग याचा दोन मुलींसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या दोन मुली कोण होत्या? हे आता समोर आले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या त्या दोन मुली आहेत. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
 
 
 
 
 

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी 'ती & ती' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेता पुष्कर जोग याने या सिनेमाची निर्मिती केली आहे. पुष्कर, सोनाली आणि प्रार्थना यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. दोन तरुणींच्या प्रेमात अडकलेला आणि गोंधळ उडालेल्या कनफ्यूझ अशा तरुणाची ही कथा आहे. पुढील वर्षी १ मार्च रोजी 'ती & ती' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
  माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/