झाशीचा इतिहास सांगणारा ‘मणिकर्णिका’चा ट्रेलर
महा एमटीबी   18-Dec-2018 
 
 
मुंबई : भारताच्या इतिहासाहात झाशीची राणी लक्ष्मीबाई या महान वीरांगनेचे नाव सुवर्ण अक्षरात कोरलेले आहे. आपल्या पाठीवर बाळाला घेऊन लढणारी शूर स्त्री म्हणून राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दलचा इतिहास शाळेत सर्वांनीच वाचला असेल. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
 
 
 
 

झाशीची राणी लक्ष्मीबाई ही व्यक्तिरेखा साकारण्याचे भाग्य अभिनेत्री कंगना रनोतला लाभले आहे. सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाल्यापासून हा सिनेमा त्याभोवती होणाऱ्या वादामुळे सतत चर्चेत राहिला आहे. मणिकर्णिकाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून नेण्यात यशस्वी होणार असे दिसते. कंगना सोबत, डॅनी डेनझोप्पा, अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी यांच्या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/