मोठ्या पडद्यावर पुन्हा धावणार ‘डोंबिवली’ लोकल
महा एमटीबी   18-Dec-2018 
 
 
मुंबई : अभिनेते संदीप कुलकर्णी यांचा ‘डोंबिवली फास्ट’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे. लवकरच डोंबिवलीवर आधारित आणखी एक सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘डोंबिवली रिटर्न’ असे या सिनेमाचे नाव आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी या सिनेमाची निर्मिती करत आहेत. नुकतेच ‘डोंबिवली रिटर्न’ या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
 

आजच्या काळातील मध्यम वर्गीय कुटुंबातील एका सामान्य व्यक्तीची कथा या सिनेमात दाखवली जाणार आहे. डोंबिवली रिटर्न’ या सिनेमात कोण कलाकार असणार, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले तरी अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्यासोबत अभिनेत्री राजेश्वरी सचदेव हिची या सिनेमात प्रमुख भूमिका असणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘डोंबिवली फास्ट’ या सिनेमाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. ‘डोंबिवली रिटर्न’ या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा व किती प्रतिसाद मिळतो हे पाहण्याजोगे असेल. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/