भारतावर पराभवाचे संकट; निम्मा संघ बाद
महा एमटीबी   17-Dec-2018


 


पर्थ : दुसऱ्या डावात भारतीय संघाची निराशाजनक सुरुवात झाली. राहुल आणि पुजाराच्या धक्क्यानंतर कोहली आणि विजय सावध खेळी करत होते. परंतु, लायनच्या फिरकीपुढे या दोघांचाही निभाव लागला नाही. चौथ्या दिवसअखेर भारताची स्थिती ५ बाद ११२ धावा अशी असून विजयासाठी भारताला आणखी १७५ धावांची गरज आहे.

 

अजिंक्य आणि हनुमा विहारी खेळ सावरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, हेझलवूडने अजिंक्यला २९ धावांवर बाद केले. दरम्यान, सुरुवातीच्या पडझडीनंतर विराट आणि विजय सावध खेळी करत होते. मात्र, लायनने त्या दोघांना बाद केले. विराट २० तर विजय १७ धावांवर बाद झाला. दरम्यान, चौथ्या दिवसाच्या उपहारानंतरचा खेळ सुरू होताच भारताने पुन्हा एकदा सामन्यावर पकड जमवली. उपहारानंतरच्या पहिल्याच षटकात शमीने ऑस्ट्रेलियाच्या २ फलंदाजांना माघारी पाठवले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उर्वरीत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना काही वेळात बाद केले. भारत-ऑस्ट्रेलियातील दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला. भारताच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच लोकेश राहुल व पुजाराच्या रुपात २ धक्के बसले. राहुल शुन्यावर तर पुजारा ४ धावा करुन माघारी परतला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २४३ धावांवर आटोपला असून भारताला विजयासाठी २८६ धावांची गरज आहे.

 

त्याआधी, नॅथन लॉयनने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताचा पहिला डाव २८३ धावांवर संपुष्टात आला. पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. विहारीच्या साथीने कोहलीने डाव पुढे नेला आणि आपले शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर विहारी (२०), कोहली (१२३) आणि शमी (०) झटपट बाद झाले. ऋषभ पंतने काही काळ झुंज दिली पण तोदेखील ३६ धावांवर माघारी परतला. अखेर बुमराहला माघारी पाठवत लॉयनने भारताचा डाव संपवला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २८३ धावांमध्ये संपुष्टात आला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/