गरुड महाविद्यालयात लेखन, काव्य अन् संगीत कार्यशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

 
शेंदुर्णी ता.जामनेर : 
 
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाची लेखन -काव्य अन् संगीत कार्यशाळा विविध सत्रांमध्ये तीन स्वतंत्र सभागृहात झाली. यात 300 प्रशिक्षणार्थी नवोदित साहित्यिक कलावंतांनी सहभाग नोंदवला.
 
 
याप्रसंगी संचालक यू.यू. पाटील अध्यक्षस्थानी होते. सुधीर फडके, ग .दि. माडगुळकर, पु.ल. देशपांडे महात्रयींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून राज्यात कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.
 
 
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सुधीर फडके, ग.दी. माडगुळकर, पु.ल. देशपांडे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यशाळा समन्वयक प्रा. भूषण पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळा आयोजनामागील भूमिका सांगितली. संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, सचिव सागरमलजी जैन, सहसचिव दीपक गरूड यांनी कार्यशाळेच्या आयोजनास शुभेच्छा दिल्या.
 
 
शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांचे महाविद्यालयास आयोजनाची संधी उपलब्ध करून दिल्याबाबत प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी मेणगाव येथील नवोदित लेखक हरी महाजन यांची कथा व प्रा. भूषण काटे यांचे संवाद असलेली चित्रपटकथा फफुटाचे विमोचन विजयराज बोधनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
याप्रसंगी लेखक मकरंद जोशी, मुंबई, संगीतकार अमित ओक -औरंगाबाद, कवी सुरेश नारायणे -नांदगाव (नाशिक), कवी संतोष कांबळे -मालेगाव, कवी देसाई -झोडगे (नाशिक), मराठी अभ्यास मंडळ व म. सा .प. सदस्य डॉ. वासुदेवजी वले, प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील, उपप्राचार्य प्रा. एन.एस. सावळे, प्रा.एस.जी. डेहरकर, प्रा .ए.एस. महाजन, डॉ . प्रशांत देशमुख उपस्थित होते. संगीत कार्यशाळेत दोन्ही सत्रात संगीतकार अमित ओक (औरंगाबाद), विकास पवार यांनी स्वर, शास्त्रीय, अर्धशास्त्रीय संगीत गीताची चाल, ताल वाद्य व सुरवाद्याची ओळख करून प्रात्यक्षिक दाखविले.
 
 
सूत्रसंचालन प्रा. निरूपमा वानखेडे यांनी केले. काव्य कार्यशाळेत पहिल्या सत्रात नांदगाव येथील प्रसिद्ध कवी प्रा. सुरेश नारायणे, दुसर्‍या सत्रात सुरेश कांबळे व तिसर्‍या सत्रात कवी देसाई यांनी अनुक्रमे कवितेचे विविध फॉर्म, काव्यालंकार, कवितेतील आशय व अभिव्यक्तीविषयक मार्गदर्शन करीत प्रात्यक्षिके करवून घेतले. सूत्रसंचालन डॉ. योगिता चौधरी यांनी केले.
 
 
लेखन कार्यशाळेत विजयराज बोधनकर, मकरंद जोशी (मुंबई), किशोर कुळकर्णी -अमळनेर यांनी तीन स्वतंत्र सत्रात मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी डॉ. श्याम साळुंखे, डॉ. प्रशांत देशमुख, प्रा. दिनेश पाटील, डॉ. ए. एन. जिवरग, प्रा. डी. एच. धारगावे, प्रा. धनवाल, अक्षय गवळी, नवल पाटील, राजेंद्र संदानशिव, बशरत तडवी यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@