बहुमतावर मंजूर केलेल्या विषयांसाठी विशेष सभा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

कायदेशीर सल्ला घेऊन गुन्हा दाखल करणार : बबलू माळी

वरणगाव : 
 
10 फेब्रुवारीला पाच मिनिटांत सभा आटोपली व सर्व विषय मंजूर करून घेतले. यामुळे नऊ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या सभेतील काही विषयांसाठी पुन्हा शनिवारी विशेष सभा घेण्यात येणार आहे
 
तसेच सभागृहाची दिशाभूल केली, यामुळे वकिलांचा सल्ला घेऊन गुन्हा दाखल करण्याची माहिती नगरसेवक बबलू माळी यांनी दिली.शहरातील विविध विषयांना मंजुरी देण्यासाठी पालिकेत जनरल सभेचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
विरोधी पक्षाचे नगरसेवक सभागृहात येण्यापूर्वी सभा संपली असल्याचे सांगून बहुमताने सर्व ठराव पारित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी 9 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून सदरची सभा रद्द करण्याची मागणी केली होती.
 
 
त्या पत्राच्या अनुषंगाने मुख्याधिकारी यांनी बबलू माळी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विषय क्रमांक 1, 2 ,9, 16 ते 22 व 24 ते 42 या विकासकामांना ठराव सर्वानुमते मंजुरी देण्यात आली असून उर्वरित ठराव क्रमांक तीन ते आठ व दहा ते पंधरा या ठरावांना तांत्रिक अडचणींमुळे स्थगित ठेवण्यात आले आहे.
 
 
स्थगित विषयांमध्ये शहरातील विविध विकासकामांच्या न्यूनतम दराच्या निविदा मंजूर करण्याचे विषय असून त्यांना स्थगित करण्यामागचे कारण काय, यासह विविध प्रश्न यावेळी बबलू माळी यांनी उपस्थित केले.
 
 
हे विषय मंजूर करण्यासाठी जनरल सभेवेळी सर्व विषय बहुमताने मंजूर केले असल्याची माहिती दिल्यानंतर या ठरावामागील स्थगिती केल्याने सभागृहाला दिशाभूल केली असून सदरची विषय मंजूर करण्यासाठी शनिवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबतचा अजेंडा नगरसेवकांना देण्यात आलेला आहे. याबाबत वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
 
 
गुन्हे दाखल झाले तरी घाबरणार नाही
 
 
सदरच्या सभेमध्ये सर्व विषय शहराच्या विकासासाठी असल्याने मंजूर करण्यात आले. परंतु, शहरातील एक ते अठरा प्रभागातील विविध विकासकामांच्या निविदेचा विषय असून तांत्रिक अडचणींमुळे या निविदा ऑनलाइन उघडू शकले नाहीत,
 
 
यामुळे त्या मंजूर करण्यासाठी विशेष सभा घेण्यात येणार आहे. विकासकामांसाठी कुणी जर अडचणी आणत असतील, अथवा गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असेल तर घाबरणार नाही.
- सुनील काळे
नगराध्यक्ष
@@AUTHORINFO_V1@@