‘सिंबा’मध्ये आणखी एका गाण्याचा रिमेक
महा एमटीबी   15-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शक ‘सिंबा’ या सिनेमाचे आणखी एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘तेरे बिन’ असे या गाण्याचे नाव असून हे गाणे एका जुन्या गाण्याचा रिमेक आहे. ‘तेरे बिन’ हे मूळ गाणे नुसरत फतेह अली खान यांनी गायले होते. सिंबा मध्ये हे गाणे एका नव्या स्वरुपात राहत फतेह अली खान यांनी सादर केले आहे. अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खान यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.
 
 
 
 
 
 
 

याआधी प्रदर्शित झालेले आंख मारे हे गाणे देखील रिमेक होते. अरशद वारसी च्या एका जुन्या गाण्याचा रिमेक होते. ‘सिंबा’ हा सिनेमासुद्धा एक रिमेकच आहे. ‘टेंपर’ या तामिळ सिनेमाचा ‘सिंबा’ हा अधिकृत रिमेक आहे. येत्या २८ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/