'रामसे ब्रदर्स'चे तुलसी रामसे कालवश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |



मुंबई : भारतीय हिंदी चित्रपटांमध्ये 'भयपट' चित्रपटांची ओळख करून देणारे दिग्दर्शक तुलसी रामसे यांचे मुंबई येथे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. ७० आणि ८०च्या दशकातील त्यांचे भयपट प्रचंड गाजले. तुलसी रामसे यांना छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे रामसे कुटुंबीयांनी सांगितले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

 

‘पुराना मंदिर’, ‘तहखाना’, ‘वीराना’, ‘बंद दरावाजा’ आणि ‘दो गज जमीन के नीचे या चित्रपटांचे दिग्दर्शन तुलसी रामसे यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी ‘झी हॉरर शो’ ही मालिकाही तुलसी रामसेंनी दिग्दर्शित केली होती. रामसे ब्रदर्स म्हणजे ७ भावंडाच्या या कंपनी ७० ते ८०च्या दशकात दमदार भयपटांची निर्मिती केली. त्यापैकीच तुलसी रामसे हे होते. बॉलिवूडमध्ये भयपट म्हंटले की रामसे ब्रदर्स हे नाव प्रामुख्याने घेतले जाते. हिंदीमध्ये भयपट चित्रपटांचा ट्रेंड रामसे बंधूंनी रुजवला. भूत, प्रेत, आत्मा या सगळ्या गोष्टी रामसे बंधूंनी त्यांच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर घेऊन आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@