पी.व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक
महा एमटीबी   15-Dec-2018चीन : चीनमधील गुआंगझाऊ येथे सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या उपांत्य फेरीत रचानॉक इन्टानॉनचा पराभव करत भारताच्या पी.व्ही. सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने इन्टानॉनचा २१-१६,२५-२३ असा पराभव केला. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड टूर ही वर्षभर चालणारी स्पर्धा आहे.

 

प्रत्येक महिन्यात जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये ही स्पर्धा भरवली गेली. ११ महिन्यांच्या ११ विजेत्यांमध्ये चीनच्या गुआंगझाऊ येथे अंतिम स्पर्धा रंगली. या अंतिम स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सिंधूने धडक मारली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये तिच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला आहे. उपांत्य फेरीतील पहिला सेट फक्त २० मिनिटांत सिंधूने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र इन्टानोनने कडवी टक्कर दिली. दोघांमध्ये २२-२२ असा टायही झाला. पण अखेर सिंधूने तिला २५-२३ असे पराभूत केले. आता अंतिम फेरीमध्ये सिंधू नोझोमी ओकुहाराशी तिचा सामना होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/