कोहली, रहाणेने सावरला डाव
महा एमटीबी   15-Dec-2018पर्थ : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३ विकेट गमावून १७२ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ८२ धावा करत भारताचा डाव सावरला. भारताने दुसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३२६ धावांमध्ये सर्वबाद केले. भारताकडून इशांत शर्माने ४ विकेट बाद केले. तर, बुमराह, उमेश यादव आणि हनुमा विहारी यांनी २-२ विकेट काढले.

 

भारतीय गोलंदाजांनी सकाळच्या सत्रात टिच्चून मारा करत ऑस्ट्रेलियाला ३२६ धावांवर रोखले. पहिल्या दिवसअखेर ६ बाद २७७ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्स यांच्या भागीदारीने ३००चा आकडा पार केला. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाला लागोपाठ धक्के बसले आणि ३२६ धावांवर डाव संपुष्टात आला.

 

भारताची पहिल्या डावाची सुरुवात अडखळत झाली. दोन्ही सलामीवीर अवघ्या ८ धावांवर माघारी परतले. त्यांनतर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली चांगला खेळ करताना तिसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. चेतेश्वर पुजारा २४ धावा करुन बाद झाला. त्यांनतर आलेल्या अजिंक्य रहाणे ५१ धावा करत विराट कोहलीसोबत ९० धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने ८२ धावा करत कर्णधाराला साजेशी खेळी करत भारताचा डाव सावरण्यास महत्वपूर्ण योगदान दिले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/