१७ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : माहिम येथील सिटीलाईट सिनेमागृहात यंदाच्या १७ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १४ डिसेंबर रोजी या चित्रपट महोत्सवाचा उद्घाटनाचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. प्रभात चित्र मंडळाचे अध्यक्ष किरण. व्ही. शांताराम यांच्या हस्ते या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय जीवन बीमा निगम आणि झी टॉकिज या महोत्सवाचे सह प्रायोजक आहेत.
 

चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाच्या या सोहळ्याला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, संगीतकार त्यागराज खाडिलकर, दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची उपस्थिती लाभली. १४ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत हा १७ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव चालणार आहे. नुकत्याच सुरु झालेल्या या चित्रपट महोत्सवामध्ये रसिक प्रेक्षकांना ३२ आशियाई चित्रपट आणि २४ लघुपट पाहता येणार आहेत. उद्घाटन सोहळ्याच्या या कार्यक्रमात प्रेमेंद्र मुझुमदार यांना सत्यजित रे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. किरण. व्ही. शांताराम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निस्वार्थीपणे चित्रपटांचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींना ‘सत्यजित रे’ हा पुरस्कार दिला जातो. प्रेमेंद्र मुझुमदार यांनी गेली ४० वर्षांहून अधिक काळ केलेल्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. याबद्दल आभार मानताना “पुरस्काराने जबाबदारी वाढते” असे मत प्रेमेंद्र मुझुमदार यांनी व्यक्त केले.

 

दिग्दर्शक सुनील सुकथनकर हे यावेळी त्यांच्या ‘वेलकम होम’ या चित्रपटाच्या निमित्ताने या सोहळ्याला उपस्थित होते. यापूर्वी त्यांचा ‘देवराई’ हा चित्रपट थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवामध्ये सादर करण्यात आला होता. चित्रपट माध्यमाकडे केवळ मनोरंजनाचा विषय म्हणून न पाहता रसिक प्रेक्षकांनी त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. त्यातूनच समाज प्रबोधन घडू शकते. असे मत दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी यावेळी व्यक्त केले. जगात आशियाई सिनेमा आता मोठा झाला आहे. त्यात आपल्या भारतीय सिनेमांचे आणि मराठी सिनेमांचेही योगदान असावे. असे किरण.व्ही.शांताराम यावेळी म्हणाले.

 

दिग्दर्शक-लेखिका सुमीत्रा भावे यांचा वेलकम होम या चित्रपटाने या चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सुमीत राघवन, अभिनेते मोहन आगाशे आणि बालकलाकार प्रांजली श्रीकांत यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. तसेच स्पृहा जोशी, सारंग साठ्ये, सिद्धार्थ मेनन हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. अभिनेता सुबोध भावे, इरावती हर्षे, प्रसाद ओक, जितेंद्र जोशी यांनी या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून काम केले आहे. सुनील सुकथनकर यांनी वेलकम होमचे दिग्दर्शन केले आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@