डांभुर्णीत यळकोट यळकोट जय मल्हार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |


 
डांभुर्णी ता.यावल :
 
येथे चंपाशष्टी निमित्ताने काही समाजबांधवांकडे खंडेराव दैवताचे पूजन करण्यात आले. यात अगोदर घट बसवून रात्री तळी उचलून गावातून मशाली पेटवून वाजत गाजत हळदीचे टिळे कपाळी लावून हळद धुळवीत यळकोट यळकोट जय मल्हार या नावाचा उदो उदो करत गावातून मिरवणूक काढण्यात आली.
 
याप्रसंगी गावात मल्हारांच्या नावाने गाव मंत्रमुक्त झाले होते. मिरवणुकीत पुरुषांसह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. याठिकाणी वांग्याचे भरीत, कळण्याची व बाजरीच्या भाकरीचे नैवेद्य दाखवून हा कार्यक्रम झाला.
@@AUTHORINFO_V1@@