सायना-कश्यप यांचे शुभमंगल
महा एमटीबी   15-Dec-2018

 

 

 
 
 
हैदराबाद : बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप हे शुक्रवारी विवाहबंधनात अडकले. शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता राईदुर्गम येथे असलेल्या सायना नेहवालच्या घरात कोर्टाच्या नियमानुसार हा लग्नसोहळा पार पडला. अशी माहिती सायनाचे वडील हरवीर सिंह यांनी दिली.
 
 
 
 

हा लग्नसोहळा खासगी ठेवण्यात आला होता. या लग्नसोहळ्यात सायना आणि कश्यपचे नातेवाईक आणि जवळचा मित्रपरिवार असे एकूण ४० जण उपस्थित होते. आंध्रप्रदेश आणि तेलंगणचे राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. दरम्यान, सायना नेहवालने आपल्या लग्नसोहळ्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले. ‘बेस्ट मॅच ऑफ माय लाईफ’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/