हिजबुलच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018
Total Views |

 

 

 
 
 
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना यश मिळाले आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर जहूर ठोकर याला कंठस्नान घालण्यात आले.
 

दहशतवादी बनण्यापूर्वी जहूर हा टेरिटोरियल आर्मीत होता. काही दिवसांपूर्वी शहीद झालेले जवान औंरगजेब याच्या हत्येप्रकरणी जहूरचे नाव समोर आले होते. त्यामुळे जहूरचा खात्मा केल्यामुळे भारतीय सुरक्षा दलाला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे. या चकमकीमध्ये भारतीय सुरक्षा दलाने हिजबुल मुजाहिद्दीनचे तीन दहशतवादी ठार केले. परंतु या चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे.

 

दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत असताना तेथील स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झटापट झाली. त्यावेळी नागरिकांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक केली. ही परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी जवानांना गोळीबार करावा लागला. जवानांनी केलेल्या या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला. २ ते ३ दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना पहाटे मिळाली होती. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांना घेरले. दहशतवादी आणि जवानांमधील चकमक अनेक तास सुरु होती. अखेर या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@