‘२.०’ चा ७०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश
महा एमटीबी   15-Dec-2018

 

 

 
 
 
 
नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘२.०’ या सिनेमाने नवा विक्रम रचला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्यामुळे या सिनेमाने आता तब्बल ७०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. ७०० कोटींची कमाई करणारा हा पहिला कॉलिवुड सिनेमा ठरला आहे.
 
 
 
 
 
 

निर्माते शंकर यांनी ‘२.०’ या सिनेमाच्या निर्मितीसाठी एकूण ५५० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. या बिग बजेट सिनेमाचा विक्रमही मोठा केला आहे. अवघ्या दोन आठवड्यातच या सिनेमाने हा विक्रम रचला. रजनीकांत, अक्षयकुमार आणि एमी जॅक्सन या कलाकारांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. रेडिएशनच्या धोक्यापासून सावध राहण्याचा सामाजिक संदेशही या सिनेमात देण्यात आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/