रिझर्व्ह बॅंकेचे मंथन सुरूच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या उपस्थितीत शुक्रवारी केंद्रीय मंडळाची बैठक मुंबईत पार पडली. सलग चार तास सुरू असलेल्या या बैठकीत प्रशासकीय कार्यशैलीवर आणखी विचार करण्याची गरज असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. याशिवाय सध्याची आर्थिक स्थिती, अर्थव्यवस्थेबद्दल स्थानिक आणि जागतिक पातळीवरील आव्हाने, रोकड टंचाई आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

 

रिझर्व्ह बॅंकेने बैठकीनंतर जाहीर केलेल्या परीपत्रकात म्हटल्यानुसार, रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यप्रणालीवर आणखी विचार करणार असल्याचे म्हटले आहे. माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कार्यकाळात अंमलबजावणी केलेल्या निर्णयांबद्दल पाठपुरावा करण्याबाबत चर्चा झाली.

 

पटेल यांनी सोमवारी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे शक्तिकांत दास यांची गव्हर्नर पदावर नियुक्ती झाली होती. केंद्रीय मंडळाची त्यांच्या उपस्थितीतली पहीली बैठक होती. यापूर्वी १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत अतिरिक्त निधी व्यवस्थापनासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आरबीआयकडे असलेली ९ लाख ४३ कोटी अतिरीक्त रोकड सरकारकडे देण्यासंदर्भातही एकत्रित निर्णय घेण्यात येईल, असे ठरले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@