समीर वर्मा, पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक
महा एमटीबी   14-Dec-2018नवी दिल्ली : भारताची फुलराणी पी.व्ही. सिंधू हिने सलग दुसऱ्या विजयासह वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीतून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या साखळी लढतीत सिंधूने चायनीज तैपईच्या ताइ त्झू यिंगला १४-२१, २१-१६, २१-१८ असे पराभूत केले. या विजयासह सिंधूच्या पराभवाची मालिकादेखील खंडित झाली आहे. गटातील तिन्ही सामने जिंकून सिंधू अव्वल स्थानावर आहे.

 

पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्माने इंडोनेशियाच्या टॅमी सुगिआर्तोवर २१-१६, २१-७ अशी मात केली. स्पर्धेतील सलामीच्या लढतीत केन्टो मोमोताकडून समीरला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आव्हान राखण्यासाठी समीरला विजय आवश्यक होता. पहिल्या गेममध्ये १७-१६ अशी निसटती आघाडी असताना समीरने सलग चार पॉइंट घेत पहिल्या गेममध्ये बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीला टॉमीने ५-३ अशी आघाडी घेतली होती. त्या वेळी सलग चार पॉइंट घेत समीरने आघाडी घेतली. त्यानंतर मात्र समीरने मागे वळून पाहिले नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/