भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ; कांगारुंची चलाख सुरुवात
महा एमटीबी   14-Dec-2018पर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये यजमानांनी नाणेफेक जिंकत पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी कांगारूंनी चलाख सुरुवात केली. त्यांनी पहिल्या दिवसअखेर ६ वर २७७ धावा असा धावफलक उभारला. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांनी आपले अर्धशतक साजरे केले. तर भारताकडून हनमा विहारी आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या तर जस्मित बुमराह आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

 

ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रापासूनच सावध सुरुवात केली. दिवसाचे पहिल्या सत्रामध्ये भारतीय गोलंदाजांनी टिचून मारा केला मात्र ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंच (२८) आणि मार्कस हॅरिस (३६) या सलामीच्या जोडीने संयमी खेळ केला. पहिल्या सत्राच्या शेवटी त्यांनी ६६ धावा केल्या. दुसऱ्या सत्रामध्ये फिंचने अर्धशतक साजरे केले. त्यानंतर लगेच बुमराहने त्याला पायचीत करत धावांच्या गतीला अडथळा आणला. उस्मान ख्वाजा आणि हॅंड्सकॉम्ब वगळता इतर फलंदाजांनी २७७ धावांमध्ये अमूल्य योगदान दिले.

 

कर्णधार विराट कोहलीचा ४ जलदगती गोलंदाजांना खेळवण्याचा निर्णय पाहिल्या दिवशी तरी फायदेशीर ठरला. भारतीय गोलंदाजांनी टिचून मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलेच अडकवून ठेवले. जस्मित बुमराहने २२ शतकांमध्ये १.८६च्या इकॉनॉमी रेटने फक्त ४१ धावा दिल्या. तसेच इतर गोलंदाजांनी विकेट्स घेत उत्तम सांघिक कामगिरी बजावली. दुसरा सामना जिंकत भारत मालिकेत २-० अशी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकत मालिका १-१ अशी बरोबरीत करण्याचा प्रयत्न करेल. सध्या ४ सामान्यांच्या मालिकेत भारत १-० असा आघाडीवर आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/