सलमान बनवणार ‘मुळशी पॅटर्न’ चा रिमेक
महा एमटीबी   13-Dec-2018


 
 
 
मुंबई : अभिनेता सलमान खान ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्मा या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘लव्हयात्री’ या सिनेमामधून सलमानने आयुषला बॉलिवुडमध्ये लाँच केले होते. परंतु ‘लव्हयात्री’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही.
 

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान मुळशी पॅटर्न सिनेमाचे हक्क मिळण्याची वाट पाहत होता. सिनेमाचे हक्क आता सलमानला मिळाले असून लवकरच तो या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात करणार आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा मुळशी गावातील सत्य घटनेवर आधारित होता. या सिनेमाद्वारे मुळशी गावातील शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली होती. या सिनेमाच्या रिमेकमध्ये आयुष शर्मा अॅक्शन रोलमध्ये दिसेल. तसेच आयुष शर्माने संजय दत्त सोबतही एक सिनेमा साईन केला आहे. त्यातही तो अॅक्शन रोलमध्ये दिसणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/