के.सी.राव यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |
 

तेलंगणा : के. चंद्रशेखर राव यांनी पुन्हा एकदा तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदाची पथ घेतली. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) निर्णायक बहुमताचा आकडा गाठत सत्ता काबीज केली. निवडणुकीत टीआरएसने ११९ पैकी ८८ जागा जिंकत सत्ता मिळवली आहे.

 

डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर चंद्रशेखर राव यांच्या टीआरएस पक्षाने ८८ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. बुधवारी टीआरएस मुख्यालय असलेल्या तेलंगणा भवनात नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. सर्वानुमते राव यांची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेलंगणाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून निवड झाली. दुपारी १२ ते वाजण्याच्या दरम्यान तेलंगणा राजभवनात शपथ सोहळा पार पडला.

 

के. सी. राव यांनी सहा महिन्यांपूर्वीच तेलंगणा विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणूकांसोबतच विधानसभा निवडणूका झाल्यास राष्ट्रीय मुद्द्यांमुळे सत्ता गमावण्याचा धोका त्यांना पत्करायचा नव्हता त्यामुळे मुदतीपूर्वीच सरकार बरखास्त केली. हा निर्णय यशस्वी ठरला आणि पुन्हा टीआरआएसचे सरकार आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@