असा आहे ‘भाई’ चा ट्रेलर
महा एमटीबी   13-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. अभिनेता सागर देशमुख या सिनेमात पु.ल देशपांडे यांची व्यक्तीरेखा साकारत आहे. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून त्यांचेच दिग्दर्शनदेखील आहे.
 

अभिनेत्री इरावती हर्षे यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. पु.ल देशपांडे यांच्या दुसऱ्या पत्नी सुनीता ठाकूर यांची व्यक्तीरेखा इरावती साकारत आहेत. तर पहिल्या पत्नीची भूमिका अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने साकारली आहे. अभिनेता सक्षम कुलकर्णी याने किशोरवयीन पु.ल देशपांडे साकरले आहेत. सारंग साठे यांने या सिनेमात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे.

 
 
 
 
पु.ल देशपांडे हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनाही या वल्लीची भुरळ पडली होती. अभिनेता सचिन खेडेकर हे पु.ल देशपांडे यांच्या वडीलांच्या भूमिकेत दिसतील. पुढील वर्षी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ४ तारखेला हा सिनेमा प्रदर्शित होत असल्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात गोड होणार यात शंका नाही.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/