ठाकरेंच्या भूमिकेला ‘या’ अभिनेत्याचा आवाज
महा एमटीबी   12-Dec-2018 
 
मुंबई : ‘ठाकरे’ हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारत आहे. परंतु या सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला आवाज मात्र एका मराठी अभिनेत्याचा असणार आहे.
 
 
 
 
 
 

सिनेमातील या भूमिकेला प्रमुख भूमिकेला आवाज देण्यासाठी अभिनेता सचिन खेडेकरची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत या सिनेमाची निर्मिती करत आहेत. अभिजित पानसे या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी २३ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत असून हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/