शक्तिकांत दास आरबीआयचे नवे गव्हर्नर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी केंद्र सरकारने शक्तिकांत दास यांची नियुक्ती केली. पटेल यांनी वैयक्तिक कारणामुळे तातडीने राजीनामा दिल्यानंतर आरबीआयचे २५ वे गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे.

 

मंगळवारी कॅबिनेटने शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीला मंजूरी दिली आहे. पूर्व अर्थसचिव शक्तिकांत दास हे पुढील तीन वर्षांसाठी या पदावर राहणार आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या विविध पदांवर त्यांनी यापूर्वी काम केले आहे. यापूर्वी ते वित्तीय समितीचे सदस्य होते. नुकत्याच झालेल्या जी २० परिषदेत ते भारताचे प्रतिनिधी होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दास यांची यापूर्वी अर्थ मंत्रालयात नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांनी अर्थ सचिवपदासाठी काम पाहीले आहे. नोटाबंदीच्या काळात त्यांची भूमिका महत्वाची मानली जात होती. मुळचे तमिळनाडूचे असलेले दास हे १९८०च्या बॅचचे आयएएस ऑफिसर आहेत. दास यांच्यासमोर मोठी आव्हाने असल्याचे म्हटले जात आहेत. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर दास गव्हर्नरपदासाठी दास यांचे नाव आघाडीवर होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@