अनिकेत विश्वासराव अडकला लग्नबंधनात
महा एमटीबी   11-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : अभिनेता अनिकेत विश्वासराव याने जसा गूपचूप साखरपुडा उरकून घेतला. तसेच त्याने कोणताही गाजावाजा न करता गूपचूप लग्नही केले. मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो अनिकेत विश्वासराव याने अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिच्याशी लग्न केले असून जवळचे काही नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. सध्या सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हा लग्नसोहळा कोठे पार पडला हे अद्याप कळू शकलेले नाही.
 
 
 
 

ऑगस्ट महिन्यात अनिकेत आणि स्नेहाने साखरपुडा केला होता. स्नेहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे आणि हळदीच्या समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. अनिकेतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मराठी सिनेसृष्टीतील काही निवडक कलाकार या लग्नाला उपस्थित होते.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/