सतीश राजवाडे पुन्हा रंगभूमीकडे
महा एमटीबी   10-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : दिग्दर्शक सतीश राजवाडे याचा ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. मालिका आणि सिनेमाच्या दिग्दर्शक म्हणून सतीश राजवाडे प्रेक्षकांना ठाऊक आहे. परंतु रंगभूमीशी जोडली गेलेली त्याची नाळ अजूनही कायम आहे. सतीशने आज तबब्ल १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
 

‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक घेऊन सतीश राजवाडे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाच्या निमित्ताने सतीश राजवाडे याचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी सतीशने ‘ऑल द बेस्ट’ या नाटकात काम केले होते. नंतर त्याने मालिका आणि सिनेमांचे दिग्दर्शन करायला सुरुवात केली.

 
 
 

‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक आल्फ्रेड हिचकॉक यांच्या कथेवर आधारित आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री हा देखील या नाटकात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पुष्कर आणि सतीश यांची जुनी मैत्री आहे. महाविद्यालयीन एकांकिकांपासून ते दोघे एकमेकांना ओळखतात. या नाटकातील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक विजय केंकरे यांना पुष्करनेच सतीशचे नाव सुचवले होते. अभिनेत्री श्वेता पेंडसे आणि अभिनेता अभिजीत केळकर हे कलाकार देखील या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/