राणी पुन्हा होणार ‘मर्दानी’
महा एमटीबी   10-Dec-2018 
 
 
मुंबई : २०१४ साली अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. लवकरच या सिनेमाचा सीक्वेल येत आहे. ‘मर्दानी’ या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई तर केलीच. पण हा सिनेमा खासकरून प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला तो म्हणजे राणी मुखर्जीमुळे!
 
सिनेमा सुपरहिट ठरण्यासाठी त्यात डॅशिंग हिरो असणे सगरजेचे नसते. तर सिनेमाचे कथानक आणि कलाकारांचा अभिनय यावरही सिनेमा हिट होतो हे राणीने दाखवून दिले. आजवर प्रेमकथांवर आधारित सिनेमे साकरणारी राणी ‘मर्दानी’ या सिनेमात एका डॅशिंग महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. ‘मर्दानी’ मध्ये गुंडांशी दोन हात करणाऱ्या राणीने हिरोईनही हिरोपेक्षा कमी नाहीत. याचे उदाहरण जगासमोर ठेवले. त्यावेळी राणी मुखर्जीच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक झाले होते.
 
 
 
 
 
यश राज फिल्म्सने ‘मर्दानी’ या सिनेमाचा सीक्वेल काढण्याच्या तयारीत आहेत. पुढील वर्षी या सिनेमाच्या सीक्वेलच्या शूटींगला सुरुवात होईल. पुढील वर्षाअखेरीपर्यंत हा सीक्वेल प्रदर्शित होईल. लग्नानंतर राणीचा हा पहिला सिनेमा असणार आहे. ‘मर्दानी २’ या सिनेमाने राणी मुखर्जी बॉलिवुडमध्ये दमदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/