पंतने सहा, धोनीला टाकले मागे
महा एमटीबी   10-Dec-2018


 


ॲडलेड : ॲडलेड येथे झालेले पहिल्या कसोटीमध्ये भारताने ७१ वर्षांनी ऑस्ट्रेलीयावर मात केली. सामन्याचा पहिला डाव सोडला तर भारताने इतर ३ डावांमध्ये चांगली कामगिरी केली. या कसोटीमध्ये पुजाराने सयंमी खेळी केली, तर गोलंदाजांनी सामूहिक कामगिरी केली. तसेच क्षेत्ररक्षणातही भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. ऋषभ पंतने गोलंदाजांना चांगली साथ देत २ डावांमध्ये ११ झेल पकडले. त्याने एका सामन्यात जास्त झेल पकडण्यामध्ये वरिधिमान सहाला मागे टाकले आहे. भारताकडून एका विकेटकिपरने कसोटीत सामन्यात सर्वाधिक बळी घेण्यात योगदान देण्याचा विक्रम वृद्धीमान सहाच्या नावावर होता. त्या पाठोपाठ ९ बळी घेत धोनी दुसऱ्या स्थानावर होता. या दोघांनी पंतने मागे टाकले आहे.

 

पंतकडे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जागा भरून काढणारा एक युवा विकेटकिपर म्हणून पाहिले जात आहे. पंतही आपल्या कामगिरीने आपली कारकिर्द यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे. इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या पंतने अवघ्या सहा कसोटी खेळल्या आहेत. पण, या सुरुवातीच्याच काळात त्याला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारखे खडतर दौरे करण्याची संधी मिळाली. त्याचे वय पाहता या दौऱ्यात त्याची फलंदाज आणि विकेटकिपर म्हणून कस लागणार होता. त्याने इंग्लंडचा जे. रसेल आणि साऊथ आफ्रिकेचा ए.बी. डिव्हिलिअर्ससोबत बरोबरी केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/