सलमान लाँच करतोय आता ‘या’ अभिनेत्रीला
महा एमटीबी   10-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : अभिनेता सलमान खान याने बॉलिवुडमध्ये आजवर अनेक नवोदित अभिनेत्रींना लाँच केले आहे. कतरिना कैफ, डेझी शाह, जॅकलिन फर्नांडिस आणि सोनाक्षी सिन्हा यांचे करिअर घडविण्यात सलमान खान याचा मोलाचा वाटा आहे. आता सलमान खान आपल्या 'नोटबुक' या आगामी सिनेमामधून एका नवोदित अभिनेत्रीला लाँच करणार आहे.
 
 
 
 

प्रनुतन बहल असे या अभिनेत्रीचे नाव असून ती अभिनेता मोहनीश बहल यांची सुपुत्री आहे. तिची आजी अभिनेत्री नूतन यांनी बॉलिवुडचा एक काळ गाजवला होता. सलमान खानने नोटबुक या सिनेमाचे पोस्टर ट्विटरवर ट्विट केले आहे. नवोदित अभिनेता जहीर इक्बालसह ती बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहे. पुढील वर्षी २९ मार्चला ‘नोटबुक’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. सलमान खानने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/