सर्जिकल स्ट्राइकची कथा सांगणारा ‘उरी’
महा एमटीबी   01-Dec-2018

 


 
 
मुंबई : अभिनेता विकी कौशल याच्या ‘उरी’ या सिनेमाचा ट्रेलर लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. येत्या डिसेंबर रोजी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलने ट्विटरुन याची माहिती दिली. जम्मू काश्मीरमधील 'उरी' येथे झालेल्या भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या चकमकीत १९ भारतीय जवान शहीद झाले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित 'उरी' हा सिनेमा आहे.
 

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री यामी गौतम यांनी ‘उरी’ या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहे. तसेच मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी, रॉनी स्क्रूवाला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. अभिनेते परेश रावल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसतील. उरी सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी अॅक्शन सीन शूट करताना विकी कौशलला दु:खापत झाली होती. 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाचा विषय भारतीयांसाठी एक भावनिक मुद्दा आहे. पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायला हवे असे उरी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाला असे वाटत होते. त्यानंतर भारतीय जवानांनी ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला. त्यावेळी संपूर्ण देशाने जवानांचे कौतुक केले होते. ‘उरी’ या सिनेमाच्या निमित्ताने पडद्यावर सर्जिकल स्ट्राइक पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

 
 
 

पुढच्या वर्षी ११ जानेवारी रोजी ‘उरी’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. यापूर्वी 'मसान', 'राझी', 'संजू' आणि 'मनमर्जियां' या सिनेमांमधून अभिनेता विकी कौशल याला प्रेक्षकांनी पाहिले आहे. आजवर विकीने विविधरंगी भूमिका साकारल्या. अल्पावधीतच विकीचा स्वत:चा एक विशिष्ट चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘उरी’ हा सिनेमा विकीच्या चाहत्यांसाठी काय नवीन घेऊन येणार हे पाहण्याजोगे असेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/